सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी
सोलापूर- सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी

सोलापूर : सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी

सोलापूर : करमाळा आणि माढा तालुक्यात विविध सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनापोटी शेतकऱ्‍यांना ३० कोटींहून अधिक निधी मिळाल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. कुकडी प्रकल्पातील पोफळज, झरे, मोरवड, विहाळ येथील भूसंपादनासाठी १३ कोटी ५० लाख, माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेतील टेंभुर्णी, कुर्डू गावातील भूसंपादनासाठी १६ कोटी ६५ लाख ११ हजार १३७ रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा: टी-20 Cricket वर्ल्डकपमध्ये सट्टा ; तरुण, बेरोजगारांचे वाढले प्रमाण

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेल्या कुकडी, दहिगाव आणि सीना माढा उपसा सिंचन योजनांच्या भूसंपादनासाठी आमदार शिंदे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार निधी मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी कुकडीसाठी २० कोटी, तर दहिगावसाठी ७ कोटी असा २७ कोटींचा निधी मिळवला आहे. करमाळा आणि माढा तालुक्यांसाठी या योजना महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही तालुक्यांतील काही गावे परस्परांच्या मतदरासंघात येतात.

loading image
go to top