MPSC Exam Pass Out Solapur City Two Sisters: घरातील अत्यंत आर्थिक अडचणींमध्येही कधी हार न मानणाऱ्या आणि एक मोठं स्वप्न उंचावणाऱ्या दोन बहिणी संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांची प्रेरणादायक कथा आज संपूर्ण राज्यात चर्चा आहे..गवळी वस्तीतील एका छोट्या गॅरेजमध्ये राहणाऱ्या ज्योतीराम भोजने यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पास करून, घरातील कठीण परिस्थितीवर मात केली आहे.संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतीराम भोजने हे एक गॅरेज चालक आहेत. त्यांचा शिक्षण पाचवीपर्यंत झाला होता. आणि गॅरेज चालवत आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्या कठीण परिस्थितीतही त्यांच्या मुलींच्या शिक्षणाबाबत कधीही त्यांना संकोच वाटला नाही. दररोजची जीवन संघर्ष पाहून, संजीवनी आणि सरोजिनी यांनी ठरवले की, त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण पार करून एक दिवस मोठ्या यशाची शिखर गाठायची आहे..Snow Moon 2025: आज रात्री 'स्नो मून' च्या प्रकाशाने उजळून निघेल आकाश, प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात असे अनोखे दृश्य पाहायला मिळते; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर.डोळ्यात फक्त आणि फक्त यश मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने बी कॉम नंतर २०१८ पासून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली. सात वर्षाच्या कालावधीत तीन वर्षे कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई-वडिलांना दाखवून दिले नाही. संजीवनी आणि सरोजिनी ह्या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या. आणि त्या दोघींनी सुद्धा एमपीएससी मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच..मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा सात वर्षात एकूण सहा एमपीएससीच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉईंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र जिद्द सोडली नाही.अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत अठरा विश्व दारिद्र्य आणि गँरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकविण्या आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कशी पडूच शकत नाहीत, याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली आहे..सरोजिनी आणि संजीवनी सांगतात की सख्ख्या बहिणी असलो तरी आम्ही पक्य्या मैत्रिणी आहोत. घरची परिस्थिती जाणीव आहे. यामुळे घरची परिस्थितीची जाणीव होती. आठ पत्रे असलेल्या घरात आई ,वडील, तीन भावंड आणि आजी असे एकूण सहा जण कसेबसे दिवस काढायचो. यातून अभ्यासाला बसताना पाय सुद्धा पसरता येत नव्हते,अशी परिस्थिती होती.परंतु आई-वडील आणि भावाची आम्हा दोघींना शिकवण्याची जिद्द होती. त्याच जिद्दीला आम्ही सुद्धा साथ दिली आणि कोणत्याही परिस्थितीत एमपीएससी मध्ये यश मिळवायचंच अशी मनाची खूनगाठ बांधली. आणि यशाला गवसनी घातली. आमची महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा दोन्ही पदासाठी पात्र असलो तरी कर सहाय्यक म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे..पुण्याला परीक्षा देताना, मावस भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीसोबत मानसिक आधार दिला. तसेच, कोरोना काळात वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी घरातील खोली फुकट दिली, ज्यामुळे त्यांनी भेदभाव न करता अभ्यास केला. संजीवनी आणि सरोजिनी यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला दिले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.