

South Solapur News Gas Cylinder Blast Burns Down a Family Home in Bankalagi and Mahadev Kogunure Meets the Affected Family
esakal
-बिसलसिद्ध काळे
दक्षिण सोलापूर: तालुक्यातील बंकलगी येथील बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या घराला गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. या घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी तातडीने दखल घेत संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.