
सोलापूर: दहिटणे येथे बांधकाम कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता. १७) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच ते सोलापूर शहरात येत आहेत. काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा होत असल्याने पक्षाकडून शक्तिप्रदर्शनाची संधी साधली जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.