

Government Demo House Controversy in Solapur PM Awas Model House Becomes Canteen Viral Video Trends
sakal
सोलापूर: दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या शेजारी लाभार्थ्यांनी घरकुल कसे बांधावे हे कळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण डेमो हाऊस उभारण्यात आला आहे. पण हा डेमो लाभार्थ्यांना पाहण्याऐवजी चक्क त्या इमारतीत कॅंटीन चालवले जात आहे. ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात महिला बचत गटास हे कॅंटीन चालवले देण्यात आल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या हेतूने हा डेमो उभारण्यात आला आहे, त्याचा उद्देश सफल झालाच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक पंचायत समिती सदस्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.