Solapur : माहेरून पाच लाख आण म्हणून विवाहितेचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेचा छळ

Solapur : माहेरून पाच लाख आण म्हणून विवाहितेचा छळ

सोलापूर : माहेरून आल्यानंतर पाच लाख रुपये, फ्रीज व ओव्हन घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वैदेही उमेश शेंडगे (रा. सिमला नगर, विजयपूर रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पती उमेश शेंडगे, सासू रुक्मिणी शेंडगे, जाऊ दिनेश शेंडगे, स्नेहा दिनेश शेंडगे, नणंद दीपा लक्ष्मण बंडगर व नंदवा लक्ष्मण जनार्दन बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.