सोलापूर : रुग्णालयाबाहेर आरोग्याचा खेळखंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : रुग्णालयाबाहेर आरोग्याचा खेळखंडोबा

सोलापूर : रुग्णालयाबाहेर आरोग्याचा खेळखंडोबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर अश्‍विनी रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत सतत ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. रुग्णांसह नातेवाईंकाचे आरोग्य धोक्‍यात आणण्याचा हा प्रकार रुग्णालयाबाहेर होत आहे. ड्रेनेजच्या घाणपाण्यातून चालतच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा किळसणावा प्रकार राजरोसपणे असून, याकडे नगरसेवक व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शहर व जिल्ह्यासह परराज्यातील नागरिक अद्ययावत उपचारासाठी अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये येतात. दररोज या हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसरात मोठ्याप्रमाणात ड्रेनेजचे पाणी साचत आहे. ॲम्बुलन्ससह इतर चारचाकी वाहनासाठी असलेली पार्किंगची जागाही खड्ड्यात असल्याने त्याठिकाणी ड्रेनेजचे पाणी कायमस्वरुपी साचून राहिल्याने हा परिसर दुर्गंधीयुक्‍त बनला आहे. याच बाजूला रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी, जेवणासाठी शेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, येथील दुर्गंधीयुक्‍त परिसर, मच्छर आदींमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बसणे असह्य बनत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णालयाबाहेर आरोग्याचा खेळखंडोबा पहायला मिळत आहे. लष्कर रोड व अश्‍विनी हॉस्पिटलला जोडणाऱ्या या छोट्या मार्गावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असते. दिवसभरात हजारो नागरिक, रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांना ड्रेनेजच्या घाणपाण्यातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

नातेवाईक वैतागले

येथील परिस्थितीबाबत स्थानिक रहिवाशांतूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, येथील ड्रेनेजलाईनच्या पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करून रुग्ण आणि नातवाईकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे. नगरसेवक व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

loading image
go to top