NHM Employees’ Indefinite Agitation in Solapur Enters Third DaySakal
सोलापूर
Solapur News: 'साेलापूरमध्ये जिल्ह्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरुच'; ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’चा तीन दिवसांपासून पूनम गेटवर ठिय्या
Ongoing Strike: दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन केले जावे, प्रत्येक वर्षी ३० टक्केप्रमाणे सेवा समाविष्ट करण्याचे धोरण ठरावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.
सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने पूनम गेटसमोर बेमुदत आंदोलन सुरूच आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १९) आंदोलन सुरू केले आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.