प्रभुलिंग वारशेट्टीSolapur: ऑपरेशन सिंदूरच्या 'गरुडा कमांडो'त सोलापूरचे सुपुत्र चंद्रशेखर अंबरकर सहभागी झाले होते. देशासाठी अभिमानास्पद पराक्रम करणाऱ्या २५ वर्षीय योद्धा चंद्रशेखर यांच्याशी दैनिक सकाळने बुधवारी संवाद साधला..जगातील १० घातक आधुनिक शस्त्रांपैकी ७ शस्त्रे चालवण्याचे यशस्वी प्रशिक्षण घेतलेल्या चंद्रशेखर यांनी ७ मे २०२५ रोजी ओपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिरेक्यांचा खात्मा करण्याच्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. त्यातील रोमहर्षक अनुभव सार्वजनिक करता येणार नाही. त्यांच्या सैन्य जीवनातील अनेक प्रेरक आठवणी त्यांनी यावेळी उलगडून सांगितल्या..ChatGPT Study Mode: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ChatGPT मध्ये आला ‘स्टडी मोड’; आता JEE, NEETसह स्पर्धा परीक्षेची तयारी करा मोफत.चंद्रशेखर यांच्या गरुडा कमांडोना ऑपरेशन सिंदूर पूर्वी अलर्ट राहण्यास सांगितल्यानंतरच महत्वाची मोहिम असल्याचा अंदाज होता. चंद्रशेखर यांनी निघण्यापूर्वी घरच्यांना 'मला काही झालेच अथवा परत नाही आलो तर रडू नका उलट मी केलेल्या कार्याचा, पराक्रमाचा अभिमान बाळगा व सर्वांना गर्वाने सांगा' असे सांगितले होते. हे वाक्य सांगताना आई प्रतिभा यांचे डोळ्यात पाणी होते.चंद्रशेखर यांची मोठी बहीण प्रियांका पोलीस दलात तर छोटी बहीण पहिली महिला लोको पायलट म्हणून रेल्वे विभागात कार्यरत आहे. मोठा भाऊ स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. बहीण भावडांचे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे आहेत..आर्मीत भरती झाल्याचे तीन महिन्यांनी समजले आई-वडिलांनामोठा भाऊ योगेश अंबरकर यांना सैन्यात भरती होण्याची प्रचंड इच्छा होती. सैन्यदलात त्यांची निवडही झाली. परंतु आई प्रतिभा यांनी विरोध केल्याने ते गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी मला सैन्यदलात भरती करण्याचा निश्चय केला. आम्ही दोघे भाऊ मिळून सराव करत असू. १८ वर्षे ६ महिने वय असतानाच मी सैन्य दलात भरती झालो. तीन महिन्यानंतर भाऊ योगेश यांनी आई-वडिलांना याची माहिती दिली.वयाच्या २० वर्षी हवाई योद्धा, मग गरुडा कमांडो ट्रेनिंगभाऊ योगेश यांचे मार्गदर्शन होते. सराव सुरू होता. घरातील वातवरणामुळे लहानपणापासूनच देशसेवेची, सैनिकांबद्दलची आत्मीयता होती. भरती झाल्यानंतर सैन्य दलातील खडतर प्रवास यशस्वीपणे पार करत वयाच्या २० व्या वर्षी हवाई योद्धा म्हणून यश प्राप्त केले. त्यानंतर कमांडो होण्याचे केवळ स्वप्न न पाहता तातडीने गरुडा कमांडो ट्रेनिंग घेण्यास सुरूवात केली. कमांडो ट्रेनिंग घेतानाचे हाल ऐकल्यानंतर आणि काही क्षण पाहिल्यानंतर आई-वडिलांचा जीव व्याकुळ व्हायचा. परंतु देशसेवेची जिद्द मनी बाळगून गरुडा कमांडो ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केले..Injury Causes: दुखापत कशामुळे होऊ शकते? जाणून घ्या प्रमुख कारणं आणि उपाय.उत्तराखंड, तामिळनाडू आणि केरळमध्ये ऑपरेशनमध्ये सहभागगरुडा कमांडो ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर उत्तराखंड येथील मुलांचे अपहरण केलेल्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलांना सुखरूप आणण्यात सहभाग होता. त्यानंतर तामिळनाडू व केरळ येथे पूरग्रस्तांचे रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी केले. तामिळनाडू येथील गर्भवती महिलेला सुखरूप रेस्क्यु केल्यानंतर त्या महिलेने मुलाचे नाव गरुडा ठेवले. केरळमध्ये ज्या कुटुंबास पुरातून सुखरूप बाहेर काढले त्या वायनाड येथील कुटुंबाने स्वत:च्या मुलीचे कन्यादान माझ्या हस्ते केले, या अविस्मरणीय घटना आहेत.चंद्रशेखर यांचे गौरवास्पद कार्यअमेरिकेतील संयुक्त राष्ट्रांच्या युद्धाभ्यासात सहभागतिन्ही दलांच्या २५०० सैनिकांमधून ७२ किमी धावण्यात प्रथमदिल्ली येथील वसुंधराभूमी येथे चंद्रशेखर यांचेही रक्त समर्पित.मुलाला काहीतरी होईल म्हणून सैन्यदलात नको जाऊ म्हणायचे. म्हणूनच मोठ्या मुलाला भरती झाल्यानंतर जाऊ दिले नाही. परंतु आज मुलाचे शौर्य पाहिल्यानंतर ऊर भरून येतो पण आई म्हणून काळजी वाटते. चंद्रशेखरच्या ऑपरेशनदरम्यान मोठा भाऊ योगेश जेवत नाही, तेंव्हा आमच्या लक्षात येते कि तो कामगिरीवर आहे.फोन येईपर्यंत जीवात जीव नसतो, पण देशसेवा महत्वाची आहे. - प्रतिभा अंबरकर, आईआम्हाला न सांगताच मोठ्या मुलाने चंद्रशेखरला सैन्य दलात भरती होण्यास मदत केली. पाणी मिळाले नाही म्हणून रक्त पिऊन त्याने दिवस काढले. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मी व पत्नी चार दिवस टीव्हीसमोरच बसून होतो. जेंव्हा यशस्वी झाल्याचे ए.के.भारती यांनी सांगितले तेंव्हा जीव भांड्यात पडला. नशीबवान म्हणूनच चार गुणी पोर आमच्या पोटी जन्माला आली.- रविकुमार अंबरकर, वडिलसैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न मी चंद्रशेखरच्या रूपाने साकारले आहे. मी नाही तर तो देशाची सेवा करतोय याचा अभिमान आहे. यापुढे बहिणीच्या मुलांनाही सैन्य दलात भरती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- योगेश अंबरकर, मोठा भाऊ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.