

Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
sakal
सोलापूर: सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत आणि १५४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एखरूख अर्थात हिप्परगा तलावाच्या पाण्यावर आता सौरऊर्जेची निर्मिती होणार आहे. तलावाच्या एकूण १ हजार ६२६ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी तब्बल १०२ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीचशे एकर क्षेत्र तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज असून, २५ वर्षांच्या कालावधीत हिप्परगा तलावाच्या या प्रकल्पातूनच सुमारे २५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.