
सोलापूर : मे महिन्यातच जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जूनअखेरीस विश्रांती घेतली. जुलै महिन्यात मोजकाच पाऊस पडला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही सायंकाळपासून जोरदार पावसाने शहरासह परिसरात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.