
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पदासाठी आज पूर्व परीक्षा झाली. सोलापूर शहरातील २७ केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत एकाच सत्रात परीक्षा झाली. या परीक्षेत ७ हजार ६९१ जणांनी सहभाग घेतला होता. सोलापुरात ही परीक्षा सुरळीत पार पडली आहे.