सोलापूर : हुतात्मा एक्स्प्रेस झाली २१ वर्षांची!

गाडी वेळेवर चालविण्याबाबत पुणे विभागाकडून दररोज विलंब होत आहे.
solapur
solapursakal

सोलापूर : सोलापूरकरांच्या लाडक्या सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचा प्रवास २१ वर्षे पूर्ण होऊन २२ व्या वर्षांच्या दिशेने जात आहे. १२ डब्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता १६ डब्यांपर्यंत येऊन पोचला आहे. हुतात्मा एक्स्प्रेसचा उद्या (ता. १५) सकाळी सहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर एकविसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत कोट्यवधी प्रवाशांनी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास केला आहे. आयसीएफ डब्यांपासून सुरू झालेला प्रवास एलएचबी डब्यांच्या लाल- पांढऱ्या रंगापर्यंत येऊन पोचल्याने सोलापूरकरांचा प्रवास सुरक्षित, आनंददायी होत आहे. १५ जुलै २००१ रोजी हुतात्मा एक्स्प्रेस सोलापूर-पुणे दरम्यान धावू लागली. यावर्षी १५ जुलै रोजी ही गाडी २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. जेव्हा ही गाडी सुरू झाली तेव्हा तिने सोलापूरकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख निर्माण केली. आजही हुतात्माला सोलापूरकरांची पहिली पसंती आहे. सुरवातीला या गाडीस जुनाट पद्धतीचे निळ्या रंगांचे १२ डबे होते.

नंतर काळानुरूप आणि प्रवाशांच्या मागणीनुसार डब्यांमध्ये वाढ करण्यात आली. हुतात्मा एक्स्प्रेस सुरू झाल्याने २५० किलोमीटरवरील साडेतीन तासांत कापता येत असल्याने पुणे गाठणे शक्य झाले आहे. तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्या प्रेरणेने व प्रवासी संघाच्या वतीने १५ जुलै २००९ रोजी पहिल्यांदा हुतात्मा एक्स्प्रेसचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला होता.

सोलापूरकरांसाठी हुतात्मा एक्स्प्रेस महत्त्वाची आहे. ही गाडी वेळेवर चालविण्याबाबत पुणे विभागाकडून दररोज विलंब होत आहे. त्यामुळे ही गाडी निर्धारित वेळेत पुणे स्टेशनला पोचण्यासाठी सोलापूर विभागाने प्रयत्न करावेत.

- संजय पाटील,अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com