
सोलापूर : शहरातील कर्णिक नगरातील सिव्हिल सोसायटीतील एका घरात गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित भिमू ठणकेदार (वय २३, रा. शांतीनगर, मड्डी वस्ती) असे तरुणाचे तर अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३, रा. शाहीर वस्ती, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.