
सोलापूर : नळाला आलेले पाणी भरून झाल्यावर इलेक्ट्रिक मोटारीचे बटन बंद करताना समृद्धी सिद्धेश हिरेमठ (वय १३, रा. नीलमनगर, सोलापूर) हिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने समृद्धी आईला पाणी भरू लागत होती. पाणी भरून झाल्यावर विद्युतपंपाची वायर काढताना तिला जीव गमवावा लागला.