
सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या तरुणास समजावून सांगण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाच त्याने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी रामलाल चौकातील प्रजा मटन स्टॉललगत घडला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी नाईन्ट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.