
सोलापूर: युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ओंकार हजारे (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांचा मृतदेह सुपर मार्केटजवळील चारचाकी कारमध्ये आढळला होता. ८ जून रोजी ओंकार हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आता मयताचा भाऊ विशाल महादेव हजारे यांच्या फिर्यादीवरून मयताची पत्नी स्वाती हिच्यासह आठ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.