esakal | Solapur: ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या धाडी : राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty
ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या धाडी : राजू शेट्टी

ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या धाडी : राजू शेट्टी

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात गेल्या सात वर्षांपूर्वी मी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. सध्या मात्र राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून धाडी टाकल्या जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पंढरपुरात केला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात शेतकरी मेळावे घेतले जात आहेत. आज पंढरपुरातील शेतकरी मेळाव्यासाठी शेट्टी आले होते.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खान, अरबाज मर्चंटला कारागृहात केलं क्वारंटाइन

शेतकरी मेळाव्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले . दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्या कारखान्यावर व मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने टाकलेला धाडीवर बोलताना आरोप केले. या वेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील साखर कारखान्यांवर धाडी टाकते हा मोदी सरकारचा स्टंट आहे. धाडी टाकल्यानंतर त्याचे पुढे काय झाले‌ हे जाहीर करावे.

शेतकऱ्यांचे साखर कारखाने लूटणार्याबरोबर आम्ही कदापी जाणार नाही. धाडी टाकून सरकार मांडवली करत असल्याचे त्यांनी सांगितले. लखीमपूरची घटना दुर्दैवी आहे. या घटनेच्या विरोधात महा विकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद केला जाणार असेल, तर आम्ही देखील या बंद मध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध करू.

ज्या कारखान्यांनी अद्यापही एफआरपी रक्कम दिली नाही असे कारखाने सुरू होणार असतील तर या कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून कारखाने बंद पाडू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

loading image
go to top