
सोलापूर : गूळ निर्मिती व विक्रीत वाढत्या संधी
सोलापूर: यावर्षी गळीत हंगामात उशिरा झालेली ऊसतोड व जादा उसाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या जीवनशैलीत उलाढाल व विक्रीमूल्य वाढत चाललेल्या गुळाच्या बाबतीत निर्मिती व विक्रीत फार मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मागील काही वर्षांत जीवनशैलीत सेंद्रिय पदार्थांचा उपयोग वाढला आहे. रसायनमुक्त व नैसर्गिक पद्धतीने तयार होत असलेली पिके व उत्पादनांची समांतर बाजारपेठ उभी राहात आहे. त्यामध्ये साखरेला उत्तम नैसर्गिक पद्धतीचा व पोषणमूल्ये असलेला पर्याय म्हणून गुळाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. मिठाई बाजारामध्ये गुळाच्या मिठायांचीही मागणी वाढते आहे. रोजच्या आयुष्यात साखरेला गुळाचा पर्याय वापरण्याची निकड मांडली जात आहे.
सेंद्रिय गूळ व पावडर निर्मितीसह बाजारपेठेत ही उत्पादने अर्थकारणास गती देत आहेत. तसेच गुळापासून तयार होणाऱ्या मिठाया व कन्फेशनरी उत्पादनांची फार मोठी संधी आहे. पण या अर्थकारणाचे लाभ उत्पादकांपर्यंत पोचवण्यासाठी पुढील काळात निर्मिती ते ब्रॅंडिंगपर्यंत सर्व टप्प्यांसाठी सहकार, महिला बचत गट चळवळ यांसारखी क्षेत्रे सक्रिय होण्याची गरज आहे. गुळाच्या बाबतीत शासनाने काही सकारात्मक धोरण घेण्याची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये गुळाचा वाढता वापर लक्षात घेता, या व्यवसायाला काही चांगले स्वरूप देता येऊ शकते. गुळाच्या भावात तेजी आली तर ते देखील अर्थकारणाला दिशा देणारे ठरू शकते. गूळ उत्पादन क्षेत्रात सहकार नसला तरी पुढील काळात काही उपउत्पादने म्हणून विचार केला पाहिजे.
- जयप्रकाश दांडेगावकर,अध्यक्ष, भारतीय साखर महासंघ
सेंद्रिय गुळाच्या निर्मितीला मोठ्या संधी आहेत. या उत्पादनाच्या माध्यमातून प्रगत जीवनशैलीसाठी सेंद्रिय गूळ हा एक उपयुक्त पोषण घटक ठरू शकतो. त्याची मागणी पुढील काळात वाढणारच आहे.
सेंद्रिय गुळाच्या निर्मितीला मोठ्या संधी आहेत. या उत्पादनाच्या माध्यमातून प्रगत जीवनशैलीसाठी सेंद्रिय गूळ हा एक उपयुक्त पोषण घटक ठरू शकतो. त्याची मागणी पुढील काळात वाढणारच आहे.
- अमर लांडे, स्टार्टअप सेंद्रिय गूळ निर्माते, सोलापूर
गुळाच्या गुणवत्तेचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. अजूनही सहकार, बचत गट, उद्योग या सर्व क्षेत्रांचे गूळ उत्पादनाकडे दुर्लक्ष आहे. उत्तर प्रदेशाच्या तुलनेत राज्याचे उत्पादन चांगले होऊ शकते.
- प्रतापसिंह परदेशी,स्टार्टअप सेंद्रिय गूळ निर्माते, सोलापूर
गूळ व्यवसाय क्षेत्राच्या अपेक्षा
गूळ निर्मितीची प्रमाणभूत प्रक्रिया निश्चिती व उत्पादकांना प्रशिक्षण
पारंपरिक गुळासोबत गूळ पावडर निर्मिती प्रक्रिया
गूळ उत्पादकांची सहकार तत्त्वावर संघटना
ऊस उत्पादकांना गावस्तरावर गूळ निर्मितीची संधी
सहकार व महिला बचत गट चळवळीला मिळावी उत्पादनाची संधी
गुळापासून विविध मिठाया, कन्फेशनरी उत्पादनाची संधी
सुक्रोज : ६५-८५ ग्रॅम
फ्रुक्टोज आणि ग्लुकोज : १०-१५ ग्रॅम
प्रथिने : २८० मिलिग्रॅम
पोटॅशियम : १०५६ मिलिग्रॅम
मॅग्नेशियम : ७०-९० मिलिग्रॅम
कॅल्शियम : ४०-१०० मिलिग्रॅम
मॅंगेनीज : ०.२-०.५ मिलिग्रॅम
फॉस्फरस : २०-९० मिलिग्रॅम
लोह : ११ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन ए : ३.८ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन सी : ७.० मिलिग्रॅम
व्हिटॅमिन ई : १११.३० मिलिग्रॅम
Web Title: Solapur Increasing Opportunities Jaggery Production Sales
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..