Solapur : बाघेश्वरबाबांना सोलापूरात येण्याचं निमंत्रण; राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टीकेची झोड Solapur Invitation Bageshwar Baba Criticism on NCP regional spokesperson Umesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील

Solapur : बाघेश्वरबाबांना सोलापूरात येण्याचं निमंत्रण; राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टीकेची झोड

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि वादग्रस्त विधान केल्याबद्दल मराठा समाजाच्या आणि संत तुकाराम महाराज अनुयायांच्या मनात प्रचंड संताप आहे,

त्या वाघेश्वर घामच्या वाघेश्वर महाराजांना सोलापुरात आणण्याबद्दलचा घाट घातला आहे, या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर श्री पाटील यांनी व्हायरल केल्यानंतर या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विशेषत्वे, या प्रकरणात उमेश पाटील यांच्यावर नेटकरी यांच्याकडून टिकेची झोड उठली आहे.त्यांना प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

उमेश पाटील यांनी वाघेश्वर महाराज यांच्या भेटीचे दोन फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली, त्यांनतर हा वाद उफाळला आहे. पाटील यांच्यावर सडकून टीका करताना नेटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार परिवार यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री वाघेश्वर महाराज यांचे समर्थन करणाऱ्या उमेश पाटील यांनी त्यांना बारामतीच्या गोविंद बागेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार परिवारात घेऊन जावे असा खोचक सल्लाही दिला आहे.श्री पाटील यांच्यावर चौफेर टीका सोशल मीडियावर नेटकरी यांच्याकडून चालू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाघेश्वर घामचे वाघेश्वर महाराज यांचे हात जोडून स्वागत केले.

तो फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत त्या खाली "लवकरचं सोलापूर नगरीत बाघेश्वर धामचे सरकार धीरेंद्र शास्त्री यांची भेट बाघेश्वर महाराज यांनी मला आवर्जून त्यांच्या दरबारी येण्याचे आमंत्रण दिले.. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय महाकाव्य कथाकार आणि बागेश्वर धाम सरकार महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू आध्यात्मिक नेते आहेत.

शास्त्री हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत" असा उल्लेख केलेली पोस्ट पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून टाकली आहे.

दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यांचा निषेध ही करण्यात येत आहे.

योगायोगाने भेट झाली; अन्य काही नाही...

दिल्लीला मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, तिथे वाघेश्वर महाराज आणि माझी योगायोगाने भेट झाली. आपल्या संस्कृतीनुसार मी अभिवादन केले. माझी ओळख सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दरबारात येण्याचे निमंत्रण दिले.

मीही त्यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले. बस एवढेच झाले.महाराजांची विचारधारणा त्यांच्यासोबत आहे, माझी विचारधारणा माझ्यासोबत आहे. विचारधारा विसंगत असणाऱ्या व्यक्तीशी अभिवादन करायचे नाही, बोलायचे नाही हे कसे होऊ शकते.