Solapur : हरला बाजार...जिंकले राजा-राणी...!

कष्टाने लावलेल्या सिताफळाच्या झाडांना फळे लागली
राजा व राणी आतकरे
राजा व राणी आतकरे sakal

सोलापूर : कष्टाने लावलेल्या सिताफळाच्या झाडांना फळे लागली...अन्‌ बाजारात भाव कोसळले...तेथूनच राजा व राणी आतकरे या दांपत्याने सुरु केले प्रक्रिया उद्योगाचे अविरत कष्ट....आज ‘राजाराणी’ ब्रॅंडची सिताफळ रबडी सोलापूरकरांची पसंती बनली आहे.

राजकुमार अतकरे यांनी त्यांच्या देगाव (ता.मोहोळ) येथे दहा एकर शेती आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शेतात एक कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे खोदले. पाण्याची सोय झाल्यावर त्यांनी सेंद्रीय पध्दतीने फळबाग लावली. त्यामध्ये पेरू, सिताफळ, आंबा, लिंबू, चिकू, नारळ, केसर आंबा आदींची लागवड झाली.

दरम्यान मागील वर्षी सिताफळे हाती आल्यानंतर त्याला १५० रुपये किलो भाव मिळाला. नंतर पुन्हा दुसऱ्या हंगामात सिताफळे लागली. पण बाजार कोसळला. व्यापाऱ्यांनी सिताफळाला ३० रुपये किलो भाव सांगितला. कष्टाने लावलेल्या सिताफळाला भाव कमी झाले तर ते कमी भावात विकायचेच नाही म्हणून त्यांनी सिताफळाचा पल्प करण्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात गेले.

तेथील शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून पल्प करण्याचे ठरवले. त्यांनी यंत्रसामुग्री खरेदी करून पल्प तयार केला. पल्पला ३०० रुपये किलो भाव मिळेल, असे लक्षात आले. पण त्यात भेसळ करण्याचे प्रकार कानावर आल्यावर त्यांनी या मार्गाने न जाता पुढे जाण्याचे ठरवले. त्यांच्याकडे असलेला पल्प हा अस्सल असल्याने त्यांनी पल्पपासून काय बनवून स्वतः विकता येईल, याचा शोध सुरु केला. तेव्हा बाजारात सिताफळ रबडीचा नावलौकीक झाल्याचे कळाले.

राजा व राणी आतकरे
Solapur News : पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंकसाठी मार्च अखेरची मुदत

तद्‌वतच त्यांनी पल्प अधिक काळ कसा टिकवता येईल, यासाठी पुन्हा कृषी विज्ञान केंद्रात जाऊन मार्गदर्शन घेतले. त्यामुळे पल्पचा टिकाऊपणा वाढला. मग त्यांनी परप्रांतातील आचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पल्पची सिताफळ रबडी बनवून घेतली. त्यासोबत राणी आतकरे यांनी रबडी बनवण्याची क्रिया समजून घेत आत्मसात केली.

राजा व राणी आतकरे
Solapur : तीस वर्षानंतर डफरीन हॉस्पिटलमध्ये ‘सिझेरियन’ ची सोय

मग राजकुमार अतकरे हे डाकसेवक असल्याने त्यांनी लोकांना २५ किलो सिताफळ रबडीचे नमुने देऊन त्यांचे अभिप्राय मागवले. अभिप्रायासोबत चक्क ७० किलोची ऑर्डरच आली. त्यांनी गड्डा यात्रेत स्टॉल लावून सिताफळ रबडीची विक्री सुरु केली. त्यांची तीन लाखाची सिताफळ रबडी हातोहात विक्री केली. त्यांनी बी फार्म झालेला त्यांचा मुलगा रोहन यास पुण्याची नोकरी सोडून देण्यास सांगून बोलावून घेतले.

रोहनच्या मदतीने त्यांनी सातरस्त्यावर राजाराणी कस्टर्डॲपल नावाचे विक्री केंद्र सुरु केले. सिताफळ रबडी सोबत सिताफळ बासुंदी, सिताफळ आईस्क्रीम, कुल्फी आदी उत्पादने बाजारात आणली. नंतर आंबा रबडी, कुल्फी, आईस्क्रीमचे उत्पादन घेतले. तसेच अंजीर रबडी देखील सुरु झाली. मॅंगो बर्फी बाजारात आणली. प्रत्येक सिझननुसार लागणारे सर्व पदार्थ ग्राहकांना दिल्याने ग्राहकांना वर्षभर अस्सल चवीची फळ प्रक्रियेचे उत्पादने पसंतीला उतरली आहेत.

ठळक बाबी

  • - फळबागेतील सिताफळासह सर्व फळाची प्रक्रिया उत्पादने

  • - सिताफळ रबडी, बासुंदी, आइस्क्रीम, कुल्फीची निर्मिती

  • - सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत फळांवर प्रक्रिया

  • - इतरांना रोजगार देत प्रक्रियेतून मिळवला फळांना रास्त भाव

  • - सरकारी मदत न घेता केली उद्योगाची उभारणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com