

सोलापूर : होटगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर आयटी पार्क साकारले जाणार आहे. आयटी पार्कसाठी ही जागा जलसंपदा विभागाकडून एमआयडीसीकडे विनामोबदला हस्तांतरित होणे आवश्यक आहे. साधारणत: २०२१-२२ मध्ये ही २० हेक्टर जागा लॉजिस्टिक पार्कला देण्याचा ठराव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात झाला होता.