Solapur : करमाळ्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी निधी मिळणार ; पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार नारायण पाटील

Solapur : करमाळ्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी निधी मिळणार ; पाटील

करमाळा : माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन रस्ते, वीज ,पाणी,आरोग्य या कामांसाठी पञ देऊन निधीची मागणी केली.असता मतदारसंघाच्या विकासकामासाठी निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले

याबाबत मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर पाटील यांनी मतदार संघातील समस्या मांडून निधी मिळावा म्हणून आग्रही मागणी यावेळी आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ उपस्थित होते.एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे असतानाच शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला होता.या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात या कामांसाठी निधीची पुर्तता केली जाणार असल्याचे मुख्यमंञी शिंदे यांनी सांगितले.

करमाळा मतदार संघातील रस्त्यांवर सुधारणा करण्यासाठी मागणी केलेल्या  निधीमध्ये कव्हे-भोगेवाडी ( 5 कोटी), सांगवी-सातोली (5 कोटी),  वंजारवाडी-कुरणवाडी-चौफुला (5 कोटी), देवळाली-गुळसडी (5 कोटी) , कर्जत-करमाळा (3 कोटी), कोंढेज-साडे (2 कोटी 50 लक्ष), गुळसडी-सरफडोह-वरकटणे-निंभोरे-वडशिवणे (5 कोटी 45 लक्ष), कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी (1 कोटी 50 लक्ष) कोळगाव-निमगाव, वरकुटे-घोटी, घोटी-निंभोरे, निंभोरे-लव्हे (4 कोटी), रोपळे-केम-वडशिवणे-कंदर- कन्हेरगाव (3 कोटी) करमाळा-जामखेड (3 कोटी), कुगाव-चिखलठाण 1-शेटफळ-जेऊर (9 कोटी 85 लक्ष) केतूर 2 ते केतूर 1,वाशिंबे-सोगाव-राजूरी-सावडी (4 कोटी 75 लक्ष), साडे-सालसे (3 कोटी) रावगाव-वंजारवाडी चौफूला (6 कोटी), वंजारवाडी चौफुला-वीट-झरे (7 कोटी), पोपळज-केडगाव (6 कोटी 50 लक्ष), प्रजिमा 8-हिसरे (3 कोटी), केडगाव-चिखलठाण (3 कोटी 20 लक्ष),कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी रा. मा. 68 ला मिळणारा रस्ता (2 कोटी) अशा रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली. तसेच भगिरथ मधून  जेऊर, वाशिंबे, लव्हे, सालसे, पोमलवाडी, हूलगेवाडी, उमरड, चिखलठाण, केम, कंदर, साडे, राजूरी, झरे, केतूर, कुंभारगाव, पोथरे, जिंती, वीट, करंजे

गावांना 100 केव्हीएचे डिपी बसवून मिळावेत म्हणून मागणी केली.याशिवाय केम  येथील श्री उत्तरेश्वर मंदिरास 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून मागणी केली.

वीज टंचाई दुर करण्यासाठी कविटगाव, वाशिंबे, केम, जातेगाव, राजूरी या ठिकाणच्या सबस्टेशन मध्ये 5 एम व्ही चे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवले जावेत अशी मागणी केली आहे.जनावरांच्या दवाखान्यांत सुधारणा व्हावी म्हणून कोर्टी, पांगरे, जिंती व केम येथील पशुवैद्यकीय केंद्रास श्रेणी 2 मधून 1 मधे रुपांतर करण्यात यावे अशी मागणी केली.