केगाव- विजयपूर बायपास अंतिम टप्प्यात | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केगाव- विजयपूर बायपास अंतिम टप्प्यात

सोलापूर : केगाव- विजयपूर बायपास अंतिम टप्प्यात

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगाव (शिवाजी नगर) येथून विजयपूर रोडवरील हत्तूरपर्यंत नवा बायपास उभारण्यात आला आहे. महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आज (शनिवारी) शेवटच्या पुलावर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नोव्हेंबरनंतर या मार्गावर जड वाहतूक सुरु होईल, असा विश्‍वास राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

केगाव ते हत्तूर हा विजयपूर रोड बायपास २१ किलोमीटरचा आहे. दोन वर्षांपूर्वी या बायपासचे काम हाती घेण्यात आले होते. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान

या बायपासमुळे जड वाहनांना आता सोलापूर शहरात येण्याची आवश्‍यकता भासणार नाही. त्यांना पुणे महामार्गावरील केगावजवळील बायपासवरून काही मिनिटात विजयपूर महामार्ग गाठता येणार आहे.

शहरातील जड वाहतूक होणार कमी

रस्ते अपघातातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. रस्ते अपघातासाठी जड वाहतूक हे प्रमुख कारण आहे. विजयपूर बायपासमुळे आता शहरातील जड वाहतूक बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्यांना कोणत्याही वेळेचे बंधन न पाळता त्या बायपासवरून थेट विजयपूरला जाता येणार आहे. त्यांचा वेळ व इंधनातही मोठी बचत होणार असून बायपासमुळे शहराची जड वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार आहे.

loading image
go to top