

Solapur Property Fraud 16 Plots Sold Using Fake Sale Deeds After Changing Original Owners Names Through Photoshop
esakal
सोलापूर : मजरेवाडीतील सत्यसाई नगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २५३/१/ब आणि नवीन सर्व्हे क्रमांक ६५/१ मधील प्लॉट क्रमांक ९४ जयश्री वासुदेव कुलकर्णी यांनी सत्यनारायण मल्लय्या कोंडी यांच्याकडून १९८८ मध्ये रीतसर खरेदी केला होता. मात्र, १२ ते १५ वर्षांपासून कुलकर्णी या प्लॉटकडे फिरकल्या नव्हत्या. याच संधीचा फायदा घेत जागा बळकावणाऱ्या रॅकेटमधील एजंटांनी ३३ वर्षांपूर्वीचा खरेदीदस्त मिळवला. फोटोशॉपच्या माध्यमातून दस्तावरील मूळ मालकाचे नाव बदलून त्या आधारे सातबाऱ्यावर नोंद करून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे एकूण १६ प्लॉट तिसऱ्यांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.