Solapur loksabha constituency : जिल्ह्यातील आमदार उपरा कसे ? ; सुदर्शन यादव

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार हे जिल्ह्यातील असून त्यांना उपरा ही टीका करून काँग्रेसवाले स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत , जिल्ह्यातील आमदार उपरा कसा ? असा सवाल भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केला.
Solapur loksabha constituency
Solapur loksabha constituencysakal
Updated on

मंगळवेढा : सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार हे जिल्ह्यातील असून त्यांना उपरा ही टीका करून काँग्रेसवाले स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत , जिल्ह्यातील आमदार उपरा कसा ? असा सवाल भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केला.

सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवार म्हणून माळशिरसचे आ. राम सातपुते यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसकडून उपरा उमेदवार टीका केली जात आहे त्या ठिकेला प्रत्युत्तर देताना जिल्हाध्यक्ष यादव म्हणाले की, महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे माळशिरस विधानसभेचे आमदार असून ते जिल्ह्यातीलच आहेत तर मग ते उपरे कसे ठरतील !

काँग्रेस पक्ष कोणत्याही विकासाभिमुख मुद्द्यावर लढण्याकरता तयार नाही कारण त्यांच्याकडे एकही मुद्दा उरला नाही , त्यामुळे कुठून तरी उपरा म्हणून टीका करून निवडणूक लढवायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे . खऱ्या अर्थानं ज्या काँग्रेसच्या उमेदवार गेली 15 वर्ष सोलापूर शहर मध्य च नेतृत्व करत आहेत त्यांचा आणि माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांचा पाच वर्षाचा कालावधी बघितला तर सर्वाधिक काम राम सातपुते यांनी आपल्या मतदारसंघात केलेली आहेत . ज्या काँग्रेस नेत्यांना वाटत राम सातपुते मतदारसंघात फिरले नाहीत त्यांनी माळशिरस मध्ये जाऊन बघावं आज कोट्यावधी निधी आणून ते काम पूर्ण झालेली आहेत .

सामान्य जनतेला वेगवेगळ्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना आरोग्य दूत म्हणून देखील संबोधलं जातं . अशा पद्धतीचे एक काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले दाखवावं . लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे हे देशाच्या विकासाचे असावेत , जनतेच्या भल्याचे असावेत , सोलापूरला वृद्धिंगत ठरणारे असावेत , पण फक्त उपरा उमेदवार म्हणून हिणवून मत मागण्याचं काम आज काँग्रेस पक्ष करत आहे . राम सातपुते हे विद्यार्थी चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आहे आणि गेली पाच वर्ष त्यांनी माळशिरस मध्ये जनतेच्या भल्याची काम केलेली आहेत . नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ , सबका विकास , सबका विश्वास असं म्हणत आमचा प्रत्येक नेता पुढे येत आहे .

Solapur loksabha constituency
Solapur Loksabha Constituency : सोलापूर लोकसभेसाठी युवा आमदारांमध्ये लढत ; आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते

संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे की कोणी कुठूनही निवडणूक लढू शकतो , मग आमच्या जिल्ह्यातील आमच्या आमदारांनी आमची लोकसभा लढवली तर काय बिघडत ? हा खऱ्या अर्थाने संविधानाचा अनादर नाही का ? काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं आणि विकासाच्या मुद्द्यावर ती निवडणूक लढवावी . लहान मुलासारखं उपरा उपरा म्हणून पाय रगडत बसू नये . काँग्रेस वाल्याना दुसरा कोणताही मुद्दा आज दिसत नाही , कारण सर्व विकासाची काम नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशभरामध्ये या महाराष्ट्रभरामध्ये आणि या जिल्हाभरामध्ये झालेली आहेत .

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केलं पण त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्याला कधी काही मिळालं नाही . ते स्वतः ऊर्जामंत्री असताना सुद्धा सोलापूर जिल्हा कायम अंधारात राहिला . स्वतः गृहमंत्री असताना देखील त्यांनी कोणतेही ठाम काम केलेलं नाही.

म्हणूनच त्यांचा पराभव दोन टर्म या जनतेने केलेला आहे आणि आता तिसरी टर्म त्यांची मुलगी आ. प्रणिती शिंदे उभा आहे पण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्याला दिसत आहे , म्हणून कोणताही मुद्दा न घेता फक्त उपरा म्हणून हिणवण्यात त्यांना धन्यता वाटत आहे . पण जनतेने ठाम ठरवलेल आहे की जो विकास करेल त्यालाच आम्ही निवडून देऊ आणि विकासाचा एकही मुद्दा काँग्रेसकडे नाही त्यामुळे जनता ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभारलेली आहे .असे मत यादव यांनी व्यक्त केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com