Vishwajeet Kadam : काम करणारी वाघीण म्हणजे सोलापूरची लेक प्रणिती

लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या सभा पार पडल्या.
Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadamsakal

सोलापूर - लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या सभा पार पडल्या. यावेळी त्यांनी सोलापूरची काम करणारी वाघीण म्हणजे प्रणिती शिंदे असे गौरवोद्‌गार काढत त्यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन केले. सोलापुरातील चांदणी चौक येथील सभेत ते बोलत होते.

आमदार कदम म्हणाले, प्रणिती शिंदे या विधानसभेत केवळ सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडत नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवतात. विकासाच्या मुद्द्यावर त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडतात. विधानसभेत त्यांची उपस्थितीही लक्षणीय आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, पाणी, वीज, रस्ते हे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्या नेहमीच आग्रही असतात. त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असून त्या जनतेचे काम करणाऱ्या सोलापूरच्या वाघीण आहेत. कदम यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली, गादेगाव आणि सोलापूरमध्ये सभा पार पडल्या.

यावेळी त्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या मांडत मोदी सरकारवर टीका केली. यावेळी माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, विनोद भोसले, अंबादास करगुळे, माजी महापौर आरिफ शेख, तौफिक शेख, बसवराज म्हेत्रे, रवी आसादे, आपचे युवकचे शहराध्यक्ष नीलेश संगेपाग, रूपेश गायकवाड, मयूर खरात, बाबू भंडारे, मल्लुबाबा म्हेत्रे, अमोल भोसले, अंबादास नाटेकर, राजासाब शेख, सिद्धांत रंगापुरे आदी उपस्थित होते. तर पंढरपूरमध्ये भगीरथ भालके, किरण घाडगे, प्रकाश पाटील, दादाराव साठे, नंदकुमार पवार, संभाजी शिंदे, नागेश फाटे आदी उपस्थित होते.

पंढरपूर शहरातही कॉर्नर सभा

पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली येथे शुक्रवारी (ता. ३) आमदार प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा पार पडली. पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी या वेळी काँग्रेसला निवडून द्या, तीर्थक्षेत्रासह आपले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन, अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी भगीरथ भालके यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com