Solapur Loksabha 2024 : सोलापुरात चाललंय काय? विधानसभेचा शब्द कुणाला? अभिजीत पाटलांना की भगीरथ भालकेंना?

Solapur Loksabha 2024
Solapur Loksabha 2024esakal

मंगळवेढा : लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात पंढरपूर विधानसभेचा शब्द द्यावा, यासाठी स्थानिक नेत्याची भूमिका स्पष्ट होईना. विधानसभेचा शब्द कुणाला देणार, याची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अभिजीत पाटील मात्र अधिक वेगाने सक्रिय झालेत तर भगीरथ भालके अद्यापही शांत आहेत.

मोदी लाटेत सलग दोन वेळा भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने भाजप यंदा हॅट्रिकच्या नादात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने मागील दोन पराभवाचे उट्टे काढण्याच्या दृष्टीने सध्या गावभेट दौरे, प्रचार यंत्रणा नियोजन आदींमध्ये काँग्रेस शांत पद्धतीने पावले टाकत आहे. त्यामुळे मताधिक्यासाठी एक-एक नेता जोडण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत गत निवडणुकीत पंढरपूर मतदार संघातून निसटते मताधिक्य मिळाले होते. आता पुन्हा मोठे मताधिक्य घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळेंच्या तालुकाध्यक्ष निवडीनंतर तालुक्यात प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यानंतर याला अधिक गती आली.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांनी प्रणिती शिंदेंच्या सुरुवातीच्या गावभेट दौऱ्यात हजेरी लावली परंतु अंतिम टप्प्यातील काही दौऱ्यात त्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. दुसऱ्या बाजूला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निसटत्या मताने पराभूत झालेले भगीरथ भालकेंचा गट हा देखील काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र त्यांनाही विधानसभेसाठी काँग्रेसच्या नेत्याकडून शब्द हवा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अभिजीत पाटील व भगीरथ भालके हे सुशील कुमार शिंदे यांच्याकडून विधानसभेचा शब्द मिळावा याच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Solapur Loksabha 2024
Prakash Ambedkar: नरेंद्र मोदींची भूमिका हिटलरसारखी ; अकोल्यातील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकरांनी घेतला समाचार

या संदर्भात गुप्त खलबते देखील झाल्याची वृत्त आहे. त्यामुळे आता सुशीलकुमार शिंदे यांचा शब्द अभिजीत पाटलांना की भगीरथ भालकेंना याची देखील चर्चा सुरू झाली. दुसऱ्या बाजूला संभाव्य विरोधक समाधान आवताडे सातपुतेंना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याही सोबत परिचारक गट अद्याप सक्रिय नाही. दरम्यान, बुधवारी पालकमंत्र्यासोबत बैठक झाली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पुण्यात बैठकीत तोडगा निघणार आहे. त्यातून परिचारक गटाला कोणता शब्द मिळणार याची उत्सुकता लागली.

Solapur Loksabha 2024
Zapatlela : 'झपाटलेला ३' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंबाने तुतारी हाती घेतल्यामुळे त्याचे पडसाद जिल्ह्यासह पंढरपूर विधानसभेच्या राजकारणावर देखील दिसून येत आहेत. 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे कारखान्याच्या निमित्ताने माढा मतदारसंघात अधिक संबंध आहे. सातत्याने मोहिते पाटील यांच्या प्रचारात अधिक सक्रियता दाखवली आहे. कदाचित भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांचा वाद सोडवण्यासाठी अभिजीत पाटील यांना माढा आणि भगीरथ भालके यांना पंढरपूरचा हा पर्याय पुढे येवू शकतो, असे समर्थकांतून बोलले जात आहे. त्यासाठी भगीरथ भालके यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र सातत्याने नाॅट रिचिबल राहणे आणि आपली भूमिका स्पष्ट न करणे हे त्यांना भविष्यात अडचणीचे ठरू शकते. अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली त्याच्या काही समर्थकानी शिंदे ना मदत करण्याची भूमिका घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com