Solapur Mahapalika :आज शेवटचा दिवस; उद्यापासून थकबाकीदारांच्या सवलती होणार बंद

पावणेदोन लाख मिळकतदारांनी कर भरलाच नाही
solapur mahapalika
solapur mahapalikasakal
Updated on

सोलापूर - महापालिका शहर व हद्दवाढ भागातील अडीच लाख मिळकतदारांपैकी केवळ ७१ हजार जणांनीच मिळकतीचा कर भरला आहे. गुरुवार (ता.३१) सवलतीत टॅक्स भरण्याची शेवटची मुदत असून शुक्रवारपासून थकबाकीदारांच्या सवलती बंद केल्या जाणार आहेत.

यंदाच्या आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑफलाइन भरल्यास पाच टक्के तर ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली जात आहे. सवलतीत टॅक्स भरण्याची मुदत गुरुवारी (ता. ३१) संपणार आहे. त्यामुळे रात्री साडेसात वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिरासमोरील कर भरणा कार्यालय सुरु ठेवले जाणार आहे.

१ सप्टेंबरनंतर मिळकत करात कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तसेच त्यानंतर थकीत रकमेवर व पहिल्या सहामाहीच्या बिलावर दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.

solapur mahapalika
Pune News : बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे येणारा रस्ता एक सप्टेंबरपासून खुला

दरम्यान, महापालिकेला दोन लाख ४९ हजार ३६८ मिळकतदारांकडून ३०८ कोटी रुपयांचा टॅक्स जमा होणे अपेक्षित आहे. पण, आतापर्यंत केवळ ७८ कोटी रुपयेच महापालिकेला मिळाले आहेत. अद्याप महापालिकेला उद्दिष्टपूर्तीसाठी २३० कोटींचा टप्पा पार करावा लागणार आहे. उत्पन्नाशिवाय महापालिकेला सोयी-सुविधा देणे अशक्य आहेत.

solapur mahapalika
SA vs Ind Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित-विराटचा पत्ता कट, हा दिग्गज होणार कर्णधार?

त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून पाच लाखांवरील थकबाकीदारांवर पहिल्या टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

थकबाकीदार मिळकतदारांवर अशी कारवाई

जे मिळकतदार थकबाकीसह चालू वर्षाचा कर भरणार नाहीत, त्यांच्या मालमत्तांची अटकवाणी (सिल) करणे, बोजा चढवणे तसेच खुल्या मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व थकबाकीदार मिळकतदारांनी उद्या (गुरुवारी) चालू बिलासह थकबाकीची रक्कम भरून कारवाई टाळावी, असा इशारा आवाहन सहायक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com