
Maharashtra Farmers
Sakal
सोलापूर : राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे.