
सोलापूर : घरावर फलक लावताना विजेचा शॉक लागून सुनील नगरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. चंद्रशेखर नारायण दोंतूल (वय ४२, विठ्ठल नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी) व गंगाधर ताटी (वय ४०, रा. सुनील नगर, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.