१६ वर्षांचा संसार, पत्नीने अचानक सोडलं; पतीनं केलं गाढविणीशी लग्न, प्रशासनाकडे न्यायाची मागणी

Husband Marries Female Donkey मूळचा पुण्याच्या असलेल्या व्यक्तीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गाढविणीशी लग्न करत अनोखं आंदोलन केलं. १६ वर्षांचा संसार सोडून अचानक पत्नी आपल्यापासून दूर गेल्यानं पतीने न्यायाची मागणी केलीय.
Husband Marries Female Donkey

Husband Marries Female Donkey

Esakal

Updated on: 

एका पतीने पत्नी परत मिळावी यासाठी गाढविणीशी लग्न करत अनोखं आंदोलन केलंय. तब्बल १६ वर्षांचा संसार अचानक मोडल्याने वैफल्यग्रस्त पतीनं हे आंदोलन करत प्रशासनासह सर्वांचंच लक्ष वेधू घेतलंय. थेट गाढविणीसोबत प्रतिकात्मक विवाह करून अनोखा निषेध नोंदवला आहे. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेट व जिल्हा परिषद गेटसमोर हा आगळावेगळा विवाह झाला. याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com