Solapur : मंगळवेढयात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : मंगळवेढयात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन

मंगळवेढा : छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास मंगळवेढयात शिवप्रेमी कडून जोडे मारून त्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

यावेळी संपुर्ण महाराष्ट्राची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाय महाराष्ट्राचं राजकारण,समाजकारण पुर्ण होऊ शकत नाही.शिवछत्रपती सर्वांचं शक्तीस्थळ आहेत अशा या शक्तीस्थळावर सातत्यानं महाराष्ट्रद्वेषी लोक हस्ते परहस्ते गरळ ओकून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी परवा औरंगाबादमधे, शिवाजी म्हणजे जुन्या काळातील आदर्श होते.

अशा पध्दतीचं अवमानकारक वक्तव्य करुन महाराजांचा हीन पध्दतीनं अपमान केला. हा काही पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही कोशारींनी, समर्थ रामदासाशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारतो अशा पध्दतींचं हिनकस उद्गार काढले होते. या नीच वृत्तीचा आम्ही मंगळवेढेकर तिव्र निषेध करतो असे परखड विचार प्रकाश मुळिक यांनी मांडले मंगळवेढ्यात सर्व शिवप्रेमींनी एकत्र येत येथील शिवप्रेमी चौकात राज्यपाल कोशारी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, प्रतिमा दहन केले.

यावेळी संदिप घुले यांनीही या विखारी विचारांचा तिव्र निषेध करत कोशारीनी त्यांच्या वयाचा आणि पदाचा विचार न करता बेताल वक्तव्य केलं आहे असं मत व्यक्त केलं. त्याच बरोबर अजित जगताप यांनीही कोशारींचा निषेध करत त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.यावेळी लतिफ तांबोळी, सतिश दत्तू,राहूल घुले,अभिजीत शिंदे,सुदर्शन ढगे,स्वप्निल फुगारे,राम पवार, संभाजी घुले,चंद्रशेखर कोंडूभैरी,विजय दत्तू,प्रदीप गायकवाड,विठ्ठल गायकवाड,संदीप फरतडे,सचिन डोरले,सचिन साळुंखे,राहुल सावंजी,इसहाक शेख, लतिफ तांबोळी,आनंद मुढे,प्रविण भोसले, विनायक दत्तू,हर्षद डोरले,रविराज वाकडे,विक्रम शेंबडे सहभागी होते.