Solapur : वाळूवरील कारवाईने मंगळवेढा पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Solapur : वाळूवरील कारवाईने मंगळवेढा पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत

मंगळवेढा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे मंगळवेढेकर जल्लोषाच्या तयारी असताना पोलिसांनी थेट नदी भीमा नदी पात्रात धाड टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 25 लाखाचा जेसीपी ताब्यात घेत वाळूवरील कारवाईच्या धडाक्याने नवीन वर्षाचे स्वागत पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणाची फिर्याद पो.काॅ सोमनाथ माने यांनी दिली असून या प्रकरणी जेसीबीच्या अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा नदी पात्रात अवैद्य वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळाली. यावर कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे व अमोल बामणे यांच्याबरोबर अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पदके कार्यान्वित केले.रात्री 10.30 वाजता ही पथके कारवाईसाठी तालुक्यातील तांडोर येथे रवाना झाली.

रात्री 11.15 च्या दरम्यान भीमा नदी पात्रात जेसीपी द्वारे अवैध्य वाळू उपसा होत असल्याचे दिसले यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला असता जेसीपी चालकाला पोलीस आल्याची कुण कुण लागली त्यानंतर नदीपत्रातून तो जेसीबी काढून पळून जाऊ लागला मात्र काळ्या चिखलात हा जेसीपी अडकून पडल्यानंतर पोलिसाला पाहताच जेसीबी चालक पळून गेला. विना क्रमांकाचा 25 लाख रुपये किमतीचा जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेतला व पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावून टाकला.याप्रकरणी गु. र. नं 01/2023 भा.द.वि कलम 375 व 511 सह पर्यावरण संरक्षण कायदा 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.