Solapur Election
sakal
सोलापूर
Solapur Election: वाढत्या निवडणूक खर्चातही राजकीय पक्षांची भक्कम तयारी; मंगळवेढ्यात तालुक्यातील निवडणूक रंगणार दमदार
Rising Election Activity in Solapur Taluka: सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. वाढत्या निवडणूक खर्चाच्या पार्श्वभूमीवरही राजकीय सत्तेत वाटा मिळवण्यासाठी सर्व पक्ष धडपडत आहेत.
हुकूम मुलाणी
मंगळवेढा : तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या वाढत्या निवडणूक खर्चात देखील पण निवडणूकीसाठी विक्री झालेल्या अर्जाची संख्या पाहता राजकीय सत्तेत वाटा सगळ्यांनाच हवा आहे अशा परिस्थितीत कोण कुणाशी युती करणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

