esakal | Solapur: मनोहर भोसलेला पुन्हा चार दिवसांची कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

मनोहर भोसले

मनोहर भोसलेला पुन्हा चार दिवसांची कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करमाळा : उंदरगाव (ता. करमाळा) येथील बलात्काराच्या गुन्हात अटकेत असलेला मनोहर भोसले यास चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मनोहर भोसलेला मंगळवारी (ता. २८) करमाळा न्यायालयात आणले होते. ता. २० रोजी दिलेली पोलिस कोठडी संपायच्या आताच तबेत बिघडल्यामुळे त्याला सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी ता. १ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

loading image
go to top