आधी सासरच्यांविरोधात तक्रार, ४० मिनिटांत विवाहितेचा मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

Married Woman Dies 40 Minutes After Dowry Harassment Complaint : ज्ञानेश्वरी रोहित जाधव (वय २८, रा. पाथरुट चौक, सोलापूर) असं मृत विवाहितेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Solapur News

Solapur News

esakal

Updated on: 

सोलापूर : माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणावी, यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. विशेष म्हणजे, सासरच्या चार जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांतच तिच्या मृत्यूची नोंद झाली. ज्ञानेश्वरी रोहित जाधव (वय २८, रा. पाथरुट चौक, सोलापूर) असं मृत विवाहितेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...