Solapur : ‘लम्पी’साठी समन्वय अधिकारी नेमावेत

नियोजन भवन येथे जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत आयोजित बैठक
animal lampy diesase
animal lampy diesaseesakal

सोलापूर : जिल्ह्यात लम्पी आजाराची जनावरे वाढत आहेत. पशुपालकांनी गायवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हशींसह येत आहेत. यामुळे येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी कारखाना प्रशासनाने करावी. यासाठी सर्व साखर कारखान्यांनी एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या.

नियोजन भवन येथे जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत आयोजित बैठकीत श्री. स्वामी बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) पांडुरंग साठे, पशुसंवर्धन उपायुक्त तथा जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ. ज्योती परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे उपस्थित होते. ऑनलाइनद्वारे सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

श्री. स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात लम्पी आजाराने ५५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३८ गाय तर १७ बैलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९३.२९ टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित जनावरांचे आठवडाभरात लसीकरण होईल, याचे नियोजन करावे.

जिल्ह्यात येणाऱ्या बैल/ गायींचे लसीकरण झाल्याचे तपासून खात्री करूनच प्रवेश द्यावा. तपासणीमध्ये त्या जनावरांना लस देऊन २१ दिवस झालेले असावे. २१ दिवस झाले नसल्यास अशा जनावरांना त्वरित कारखाना परिसरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावा. यासाठी साखर कारखाना प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. संपर्कात राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही श्री. स्वामी यांनी केल्या.

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे

सध्या शासनाकडून ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात काय पीक घेतले, हे ॲपच्या माध्यमातून स्वत: पिकाची नोंद करता येणार आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. साखर कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र ऑनलाइन होईल, यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. ई-पीक पाहणीचे नवीन ॲप व्हर्जन आले आहे. यामुळे स्वत:च्या शेतात, पिकात जाऊन फोटो काढून अपलोड करता येतो. यामध्ये गट कोणता हेही ॲपवर समजणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com