Solapur News: मोठी धक्कादायक बातमी! ७०० शाळांतील विद्यार्थ्यांचे महिनाभरापासून जेवण बंद, करार संपला अन् ताट रिकामे

Mid Day Meals Stopped In 700 Solapur Schools: सोलापूर जिल्ह्यात धान्य पुरवठादाराचा करार संपल्याने ७०० हून अधिक शाळांमध्ये महिनाभरापासून पोषण आहार बंद आहे. हजारो विद्यार्थी दुपारच्या जेवणापासून वंचित असून, दोन दिवसांत पुरवठा सुरू होईल, असा शिक्षण विभागाचा दावा आहे.
Maharashtra Mid Day Meal Crisis Contract Delay Disrupts Nutrition Food Supply In 700 Solapur Schools

Maharashtra Mid Day Meal Crisis Contract Delay Disrupts Nutrition Food Supply In 700 Solapur Schools

sakal

Updated on

सोलापूर: शासनाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असताना त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे. शालेय पोषण आहारासाठी धान्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा करार ९ जूनला संपल्यानंतर नव्या कराराला झालेल्या विलंबामुळे जिल्ह्यातील ७०० हून अधिक शाळांमध्ये पोषण आहार बंद पडला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे हक्काचे दुपारचे जेवण गेल्या महिनाभरापासून बंद आहे. दरम्यान, करार प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन दिवसांत नियमित धान्यपुरवठा सुरू होईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com