Solapur : माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर विरोधी विजयराज डोंगरेंनी साधला निशाणा

'नक्षञ' मधून वाचण्यासाठी राजन पाटील यांचा भाजप प्रवेश
 राजन पाटील
राजन पाटीलsakal

सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे आपल्यासह परिवाराला 'नक्षत्र' प्रकरणातून वाचण्यासाठी भाजपात प्रवेश करत आहेत, पाणी प्रश्नासाठी या पक्षात प्रवेश करतोय, असे त्यांनी म्हणणे हे बेगडी सोंग असल्याची टीका लोकशक्ती परिवाराच्या नेते आणि राजन पाटील विरोधक विजयराज डोंगरे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

विशेष म्हणजे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मोहोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तो सोडविण्यासाठी यापूर्वीच पाठपुरावा झाल्याचे आणि सध्याही सुरू असल्याचेही डोंगरे यांनी म्हटले आहे.

पाण्याचे निमित्त करून बेगडी सोंग घेत, भाजप प्रवेश करणाऱ्या राजन पाटील यांना जनता ओळखून आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

'पाण्याचे निमित्त करून भाजपात येऊ नका, भाजप वाढण्यासाठी खुशाल या. पण भाजपात येण्यासाठी पाण्याची निमित्त करू नका, आपण भाजपमध्ये नाही आला तरी पाण्याच्या संदर्भात सर्वे होऊन सहा महिन्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लागणारच आहे असाही मुद्दा डोंगरे आणि उपस्थित केला आहे.

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या अर्धवट कामासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह आम्ही शिष्ट मंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरात भेटलो होतो. सन २०१४ ते २०१९ या काळात आष्टी उपसा सिंचन योजनेचे ९० टक्के काम भाजपमुळेच झाले आहे.

तत्कालीन दिवंगत आमदार चंद्रकांत निंबाळकर तसेच मनोहर डोंगरे यांनी आपल्या प्रयत्नातून आष्टी उपसा सिंचन योजनेचा उदभव खंडाळी ज्योतिबाचा माळ केला. दरम्यान १९९५ ला कोण आमदार होते याचे आत्मपरीक्षण करावे.

सन १९९५ ला आमदार बबनराव शिंदे मंत्री पदाला लाथ मारून सीना माढा सिंचन योजना मंजूर करून आणली, या दरम्यान मोहोळला कोण आमदार होते.सन २००९ पासून पुढे सरकार कोणाचे होते ? या काळात आष्टी उपसा सिंचन योजना अधर्वट कशी राहिली ? विजयराज डोंगरे यांनी करत माजी आमदार राजन पाटील हे प्रवेश भाजप प्रवेशासाठी केवळ निमित्त पुढे करीत आहेत, नक्षत्र प्रकरणात त्यांची लेकरं बाळ अडकली होती हे सांगायचं सोडून पाटील हे पाण्याचे कारण सांगत आहेत, हे त्यांचे बेगडी सोंग आहे‌‌. हे सोंग जनता ओळखून आहे, असै सांगत डोंगरे यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

पाटील यांचे धोरण म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज चली गई'

राजन पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या पंधरा वर्षाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लावली नाही, आणि आत्ता या योजनेसाठी भाजप प्रवेश करतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे, असे राजन पाटील सांगत आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया पर्यायाने धोरण म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज चली गई, असेच आहे अशी टीका डोंगरे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com