

Delegates raise the issue of DJ noise pollution during the Solapur Model Assembly session.
Sakal
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डीजेमुक्तीचा आवाज आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुलंद झाला. प्रामुख्याने ‘सकाळ’ या दैनिकाने यासाठी अतिशय चांगला प्रयोग केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी केला. डीजेमुक्त महाराष्ट्रचा सहा महिन्यांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याची मागणी केली. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्रालयासोबत संयुक्त समिती स्थापन करू, असे सांगितले.