Solapur News: ई-रुपी प्रणाली मुळे बेहिशोबी व्यवहारावर गडांतर कर सल्लागार संजीव कोठाडिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News: ई-रुपी प्रणाली मुळे बेहिशोबी व्यवहारावर गडांतर कर सल्लागार संजीव कोठाडिया

मोहोळ : ई-रुपी प्रणाली मुळे रोख व्यवहार, बेहिशोबी व्यवहारावर, गंडांतर येणार असुन भ्रष्टाचार संपेल. प्रत्यक्ष नोटा छापण्याचा दर वर्षीचा खर्च पाच हजार कोटी रुपये आहे त्याची बचत होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कर सल्लागार संजीव कोठाडिया यांनी केले.

मोहोळ तालुका व्यापारी असोसिएशन व देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथे "ई-रुपी जनजागृती अभियानाचे" आयोजन केले होते त्यावेळी कोठाडिया मार्गदर्शन करीत होते.अध्यक्ष स्थानी आकाश फाटे होते.

कोठाडिया पुढे म्हणाले,या प्रणाली मुळे डॉलरची मक्तेदारी संपेल तसेच आयकर व जी.एस. टी.यांचे संकलनही वाढेल. क्रेपटोकरन्सी मधून भारतीय नागरीक बाहेर पडतील.

मागील सहा वर्षात 54 कोटीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ई- रुपी मुळे बनावट नोटा बंद होतील अशी माहीती ही संजीव कोठाडिया यांनी दिली.

एकूण 140 कोटी लोकसंखे पैकी 115 कोटी आधारकार्ड धारक आहेत, तसेच 40 कोटी पॅन धारक हे आधारशी जोडलेले असल्यामुळे व ई- रुपी येणार असल्यामुळे अर्थ व्यवस्थेमध्ये मोठी क्रांती होईल.

सर्व व्यापारी बंधुनी आत्ताच नियोजन करून " योग्य तो आयकर व जी. एस. टी. भरून " देशांच्या या आर्थिक क्रांतीमधे सहभागी व्हावे,

असे अवाहनही कोठाडिया यांनी केले. 95 कोटी निवडणूक कार्ड धारक हे आधारकार्ड ला जोडलेले आहेत. तसेच 100 कोटी मोबाईल धारक हे ही आधार कार्डशी जोडलेले आहेत.

मोबाईल मार्फत सर्व व्यवहार अदृश्य पद्धतीने होणार आहेत व त्यांचे ट्रॅकिंग होणार आहे. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून घेतली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दळवी, संजय मोरे मोहोळ तालुका व्यापारी असोसिएशन चे चेतन शहा, व्यंकटेश मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमा साठी प्रमोद डोके, सुजित गोडसे, स़ुलतान मुलाणी, अभिमान वाघमोडे आदिसह व्यापारी मोठया संखेने उपस्थित होते.