सोलापूर : वीज बिल भरणे अनिवार्य; महावितरणची भुमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB

सोलापूर : वीज बिल भरणे अनिवार्य; महावितरणची भुमिका

भोसे :- मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील कोरे वस्ती डी.पी.वरील शेतीपंपाची बिले भरून देखील ट्रान्सफॉर्मर जळल्यानंतर आता बिले भरली तरच ट्रान्सफॉर्म दिला जाईल अन्यथा नाही अशी तुघलकी भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने या परिसरातील शेतीच्या पाण्यासह व जनावरांचे गेल्या पंधरा दिवसापासून हाल होत आहेत.

भोसे शिरनांदगी रस्त्या शेजारील कोरे वस्तीवरील शेती पंपाला पाणीपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळून पंधरा दिवस झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांकडे जर्सी गाईंची व जनावरांची संख्या जास्त असल्याने जनावरांची व शेतकऱ्यांचे पाण्या वाचून हाल होत आहेत ट्रान्सफॉर्म जळाल्यानंतर आठ दिवस मंगळवेढ्याचे मुख्य अभियंता चोरमुले यांना आठ दिवस वारंवार कळवून देखील आठ दिवसानंतर ट्रान्सफॉर्मर काढून नेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळ काढू पण केला असून ट्रान्सफॉर्मर नेऊन आठ दिवस उलटले तरी ट्रांसफार्मर दिला जात नाही वारंवार चौकशी केली असता बिले भरली तरच ट्रान्सफॉर्म दिला जाईल अधिकारी वारवार सांगत आहेत.

कोरे डीपी वरील शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी संजीवनी योजनेत गावामध्ये सर्वप्रथम बिले भरून देखील ट्रान्सफॉर्मर् जळाल्यानंतर महावितरण कडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या पंधरा दिवसापासून कोरे वस्ती परिसरातील शेतकरी व जनावरांना केवळ विजेअभावी पाण्यासाठी वणवणं भटकंतीची वेळ आली. थकीत बिलासाठी वीज जोड तोडल्यानंतर सदर जोडणी पूर्ववत करण्याचे आदेश असताना आता डीपीच्या नावाखाली वसुलीचा तुगलगी आदेश महावितरण कोणत्या अधिकाराखाली करत आहे असा सवाल येथील शेतकऱ्यातून विचारला जात आहे. राजकीय नेते आणि शेतकऱ्याशी संबंधित संघटना देखील या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत.

कृषिसंजीवनी योजनेत आमचे डी पी वरील बिल वेळच्या वेळी भरून देखील महावितरणचे अधिकारी मुद्दाम डी पी जळाल्यानतर वेळ काढूपणा करत असल्याने याची चौकशी होने गरजेचे आहे पाण्याअभावी सध्या जनावराचे हाल सुरु आहेत महावितरन् कंपनीस आमचा डी पी तत्काळ देणे जमत नसेल तर आमचा डी पी परत आहे त्या अवस्थेत द्यावा.अशी भूमिका महावितरण घेतल्यावर बिलाची वसुली होऊ शकते का ? याचा देखील विचार अधिकाऱ्याने गांभीर्याने करणे गरजेचे आहे.

- महासिद्ध कोरे शेतकरी भोसे

Web Title: Solapur Mseb Action On Overdue Electricity Bill Consumer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..