
सोलापूर : गडकरींकडे मागितले महापालिकेने ७४ कोटी
सोलापूर : महापालिकेनी आसरा समांतर पूल आणि आसरा चौक ते विजापूर रोडला जोडणारा रस्ता या दोन्ही कामांसाठी ७४ कोटी निधी मागणीचे दोन स्वतंत्र प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.महापालिका आणि रेल्वे विभागाने आसरा समांतर पूल कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. महापालिका या पूलासाठी २६ कोटी रुपयांचे विकास आराखडा तयार केले आहे.
हा विकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने रेल्वे प्रशासनाला १८ लाख रुपये दिले आहेत. हे पूल महापालिकेच्या पैशांतून साकारण्यात येत असल तरी पूल उभारणीचे संपूर्ण काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र दोन्ही पुलाच्या जोडणीचे काम महापालिकेचे असणार आहे. उड्डाणपूल कामासाठी १४ कोटी रुपये तर समांतर पूलाच्या जोडणी व इतर तांत्रिकबाबीसाठी १२ कोटी असे २६ कोटी निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव देण्यात आला. तसेच आसरा चौक ते विजापूर रोडला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४८ कोटींची आवश्यकता आहे. या मार्गासाठी ४८ कोटी निधी मागणीचा स्वतंत्र प्रस्तावदेखील बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकी प्रसंगी दिले. शहर विकासाच्यादृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एकंदरीत ७४ कोटींची मागणी केली असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
Web Title: Solapur Municipal Corporation Gadkari 74 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..