नगरसेवकांचा संताप... आम्ही फक्त हात वर करायला यायचे का...

नगरसेवकांचा संताप... आम्ही फक्त हात वर करायला यायचे का...
Updated on

सोलापूर : आमच्या लक्षवेधीच्या प्रश्नांना उत्तरे द्या, अशी मागणी करणारे शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी खाली बसायला लावले आणि नंतर अधिकारी उत्तरे देतील असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या हंचाटे यांनी आम्ही फक्त हात वर करायला यायचे का, असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. लक्षवेधीचे उत्तरे अधिकाऱ्यांकडून तत्पर अपेक्षित असताना, महापौरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

कोट्यवधींचे नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष
महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी सुरु झाली. त्यावेळी श्री. हंचाटे यांनी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारे तीन प्रश्न उपस्थित केले. सिद्धेश्वर कारखान्याचे असेसमेंट न झाल्याने आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, शहरातील अनधिकृत मोबाईल टॅावरमुळे कोट्यधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे आणि महापालिका न्यायालय अद्यापही अस्तित्वात असल्याने दरमहा लाखो रुपयांचा खर्च होत आहे, या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. त्यावेळी संबंधित अधिकार्यांना बोलावून उत्तरे देण्यास सांगण्याची मागणी त्यांनी केली. मात्र लक्षवेधीची वेळ संपल्याचे कारण देत महापौरांनी अधिकारी नंतर उत्तर देतील असे सांगितले. त्यावेळी हंचाटे चिडले. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडविणार्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता, त्वरीत उत्तर आवश्यक आहे. तर ते मिळत नसतील तर आम्ही फक्त हात वर करायला यायचे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी महापौरांनी नमते घेतले आणि एक प्रश्नाचे उत्तर मिळेल असे सांगितले. 

मोबाईल असलेल्या मिळकतींवर बोजाची मागणी
शहरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॅावरमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ज्यांनी भाडे भरले नाही किंवा ज्यांनी परवानगी घेतली नाही, त्या कंपनीच्या मोबाईल टॅावरला सील करावे किंवा ज्या ठिकाणी टॅावर आहेत त्या मिळकतींवर बोजा चढवावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी अभियंता शांताराम आवताडे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अशी कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com