सोलापूर : ऑनलाइन कर भरा, सहा टक्के सूट मिळवा

महापालिकेचे शहरवासीयांना आवाहन
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporationsakal
Updated on

सोलापूर : महापालिकेकडून मिळकतकराची पावती मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत ऑनलाइन कर भरून सहा टक्के सूट मिळवा, असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी शहरवासीयांना केले आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या कर बिलाच्या पावत्यांचे पोस्ट ऑफिस व मालमत्ता कर विभागाच्या वतीने वाटप सुरू आहे. बिल प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत थकबाकीसह संपूर्ण बिल ऑफलाइन भरल्यास पाच टक्के तर ऑनलाइन बिल भरल्यास सहा टक्के सवलत देण्यात येणार आहे. ज्यांना बिल मिळाले नाही त्यांना मिळकतकर ऑनलाइन solapurcorporation.gov.in या वेबसाइटवर मिळेल किंवा महापालिकेत प्रत्यक्ष बिल प्राप्त करून घेता येईल.

तसेच सीएफसी (हुतात्मा स्मृती मंदिर), जुळे सोलापूर पाणी टाकी जवळ, विभागीय कार्यालय क्रमांक दोन, विभागीय कार्यालय क्रमांक पाच, शेळगी आर.सी.एच. दवाखाना, बाळे कर संकलन केंद्र येथे कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. तरी मिळकतदारांनी मिळकतकर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com