Solapur News: साेलापूर पालिकेला उमगली चूक; आता ई-टॉयलेट मोफत, चेन्नईच्या कंपनीला देखभाल दुरुस्तीचा मक्ता

E-Toilets in Solapur Made Free After Policy Review: ई-टॉयलेटमुळे शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा अपेक्षित होती. पण, सुविधेसाठी सुट्टे पैसे टाकावे लागत. गरजेच्या वेळी नागरिकांकडे नाणे नसल्याने ई-टायलेट अडगळीत पडून होते. पालिकेला चार वर्षांनी चूक उमगली आणि आता सुविधा मोफत झाली.
Solapur Municipal Corporation declares e-toilets free for public use after reviewing its earlier policy; Chennai-based company to oversee repairs and maintenance.
Solapur Municipal Corporation declares e-toilets free for public use after reviewing its earlier policy; Chennai-based company to oversee repairs and maintenance.Sakal
Updated on

-प्रमिला चोरगी

सोलापूर : शहरातील ई टॉयलेटबाबत महपालिकेला तब्बल चार वर्षांनी चूक उमगली. त्यामुळे ई-टायलेटची सेवा मोफत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी चेन्नईच्या कंपनीला देखभाल व दुरुस्तीचा दोन वर्षांचा ४० लाखाचा मक्ता दिला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील वर्दळीच्या २५ ठिकाणी ५१ ई-टॉयलेट उभारण्यात आले होते. या ई-टॉयलेटमुळे शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा अपेक्षित होती. पण, सुविधेसाठी सुट्टे पैसे टाकावे लागत. गरजेच्या वेळी नागरिकांकडे नाणे नसल्याने ई-टायलेट अडगळीत पडून होते. पालिकेला चार वर्षांनी चूक उमगली आणि आता सुविधा मोफत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com