District President Chavan Claims Success in Breaking Alliance Tactics
Sakal
Solapur Politics : जिल्ह्यात आघाडीचे डावपेच मोडून पक्ष चिन्हावरच निवडणुका - जिल्हाध्यक्ष चव्हाण!
मंगळवेढा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करणाऱ्यांचे राजकीय डावपेच मोडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या कमळ चिन्ह्यावर उमेदवार उभे करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी वार्तालाप करत होते.यावेळी राज्य प्रतिनिधी राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, सुदर्शन यादव,अंकुश आवताडे,शंकर वाघमारे, सुशांत हजारे, सुशील क्षिरसागर,कपिल हजारे,लहू आवताडे,अजित लेंडवे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यामध्ये नगरपालिका निवडणुका या पक्ष चिन्हा ऐवजी आघाडीच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रही होते.

