सोलापूर : महापालिकेच्या शाळेला गळती

शिक्षिकेने ठेवल्या बादल्या; दुरुस्ती करूनही गळती बंद नाही
school
schoolsakal
Updated on

सोलापूर : शहरात महापालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढल्याचा डंका पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाला पावसाळ्याच्या तोंडावर जुन्या शाळांची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे नऊ नंबर शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात शिक्षणाचे धडे द्यावे लागले.

महापालिकेच्या बहुतेक शाळांच्या इमारती खूपच जुन्या आहेत. पंचकट्टा परिसरातील नऊ नंबर शाळेची इमारत ७० ते ७५ वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. त्या शाळेवर पत्रे असून जीर्ण झालेल्या पत्र्यातून पावसाचे पाणी शाळेत येत होते. पत्र्यातून पडणारे पाणी फरशीवर पडू नये म्हणून शिक्षिकेने त्याठिकाणी कचऱ्याच्या बादल्या ठेवल्या होत्या. शिकविताना अधून मधून त्या शिक्षिकेला पाण्याने भरलेली बादली बाहेर ओतून द्यावी लागत होती. दुसरीकडे फरशीवर पडलेले पाणी कापडाने बादलीत पिळावे लागत होते.

दिवसभर पाऊस चालू असल्याने मुलांच्या बाकडांखाली पाणी येऊन त्यांचे पाय ओले होतात. त्या शाळेच्या एकूण आठ खोल्या आहेत, पण त्यातील चार खोल्या धोकादायक झाल्याने बंदच आहेत. ज्या वर्गखोल्यात शाळा भरते, त्याची दुरुस्ती यापूर्वी करण्यात आली आहे. तरीपण गळती बंद झाली नाही हे विशेष. अनेकदा पत्रव्यवहार करूनही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य वाटले नाही. आता पुन्हा शिक्षकांनी

फोटोसह शाळेची अवस्था अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर अधिकाऱ्यांनी शाळेचे पत्रे दुरुस्तीसंदर्भात झोन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी तत्काळ त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

धोकादायक इमारतीत शाळा नकोच

शहरात महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. त्यातील बहुतेक शाळांच्या इमारती खूपच जुन्या असून काही इमारतींना चिरा पडल्या असून काही शाळांचे जुनाट पत्रे पावसाळ्यात गळतात. दहा नंबर शाळेच्या आवारात गवत वाढले असून मुलांना त्याची भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी धोकादायक इमारतीत शाळा भरवू नये, मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सर्व पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com