Solapur News : महापालिकेच्या दहा रूग्णालयांमध्ये जेनेरिक औषध केंद्र

‘नॅकोफ’शी करार; गोरगरिबांना कमी पैशात दर्जेदार औषधे, नागरिकांना आर्थिक दिलासा
Medicine
Medicinesakal

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या प्रसुतीगृह दवाखान्यांसह इतर नागरी आरोग्य केंद्रामध्ये दहा ठिकाणी अमृत स्टोअरच्या धर्तीवर जेनेरिक औषधी केंद्रे उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अहिल्यादेवी होळकर, रामवाडी आणि दाराशा या तीन प्रसुतीगृह ठिकाणी औषध केंद्र उभारण्याचे काम सुरू असून अन्य सात ठिकाणी केंद्र उभारणीला मान्यता मिळाली आहे.

या केंद्रांच्या उभारणीसंदर्भात सरकारमान्य नॅकोफ इंडिया लिमिटेड संस्थेसोबत दहा वर्षाचा करार करण्यात आला आहे. या केंद्रांमधून सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना कमी किंमतीत औषधे मिळण्याला मदत होईल.महापालिकेकडून नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

नागरिकांचा औषधोपचारांवर होणारा अवाढव्य खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना कमी पैशात दर्जेदार औषध उपलब्ध व्हावीत, या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना जेनेरिक औषध केंद्र उभारण्याबाबतचे आदेश दिले. या आदेशानुसार, महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व रुग्णालय परिसरात महापालिका प्रशासनाच्यावतीने जेनेरिक औषध केंद्र उभारले जाणार आहे.

Medicine
Solapur Crime : विवाहितेचा छळ करून खून; रेल्वे स्टेशनवर आढळला मृतदेह, 'तिच्या'जवळ होती चिठ्ठी!

त्यासाठी अमृत स्टोअरच्या धर्तीवर नॅकोफ इंडिया लिमिटेड (एनएसीओएफ) या संस्थेस औषधी दुकान सुरू करण्यासाठी लागणारी जागा व इतर आवश्यक सोई-सुविधा रुग्णालय परिसरात महापालिका उपलब्ध करून देणार आहे.

संबंधित संस्थेकडून महापालिकेला रेडीरेकनर दराने जागेचा मोबदला मिळणार आहे. प्रशासनाने या संस्थेशी दहा वर्षांचा करार केला असून दर तीन वर्षांनी भाडेकरारामध्ये पाच टक्क्यांची दरवाढही निश्चित केली आहे. त्यामुळे महापालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या जागेच्या भाडेपोटीच्या रक्कमेतून नागरिकांना इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास हातभार लागणार आहे. तसेच या नागरी औषध केंद्रामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याबरोबर आर्थिक लूटही थांबणार आहे.

Medicine
Solapur Politics : 'खासदार ओवैसींच्या नेतृत्वात महापालिका, विधानसभा निवडणुकीत MIM किंगमेकर ठरणार'

‘या’ ठिकाणी होणार औषधी केंद्र

पु. रा. अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह, रामवाडी प्रसुतीगृह, दाराशा प्रसुतीगृह या तीन ठिकाणी दहा वर्षे कालावधीकरिता जेनेरिक औषधी केंद्र सुरु करण्यासाठी ठराव होऊन कार्यवाही सुरू आहे. तर विडी घरकुल, मुद्रा सनसिटी, जिजामाता, देगाव या चार नागरी आरोग्य केंद्रांसह साबळे प्रसुतीगृह, हिंगलाजमाता प्रसुतीगृह, चाकोते प्रसुतीगृह अशा सात ठिकाणी औषध केंद्र उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे.

Medicine
Solapur Airport : विमानतळाच्या लायसनसाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी; DGC कडून परवानगी आवश्यक, 50 कोटींची गरज

समाज मंदिरामध्ये उभारणार आरोग्यवर्धिनी केंद्र

सोलापूर शहरासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२ आरोग्यवर्धिनी केंद्र आणि २०२३-२४ या वर्षामध्ये ३१ अशी एकूण ४३ आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर आहेत. १२ पैकी सात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांची उभारणी जागेअभावी रखडली आहे.

आता नव्याने मंजूर झालेल्या ३१ आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध करून दिला असल्याने हा निधी वेळेत खर्चही होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने २१ आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी महापालिकेच्या मालकीच्या समाज मंदिरांचा पर्याय काढला आहे. उर्वरित केंद्रांसाठी लागणाऱ्या जागा भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com